देशातील पहिल्या महिला बँकेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

November 19, 2013 7:56 PM0 commentsViews: 334

bmb bank _news19 नोव्हेंबर : देशातील पहिल्या महिला बँकेचं उद्‌घाटन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते पार पडलं. बँकेचं मुख्य कार्यालय दिल्लीत आहे, पण दिल्लीत विधानसभा निवडणुकीमुळे तिथे आचारसंहिता लागू असल्यामुळे या बँकेचं उद्घाटन मुंबईत झालं.

ही बँक पूर्णपणे महिला चालवणार आहेत. मुंबई बरोबरच दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई, अहमदाबाद, गुवाहाटी सारख्या प्रमुख शहरांमध्ये लवकरच या शाखा सुरू होणार असून 2014 पर्यंत देशभरात या बँकेच्या 25 शाखा उघडल्या जाणार आहेत. या बँकेसाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

अर्थमंत्री पी.चिंदबरम यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात महिला बँकेची घोषणा केली होती आणि त्यासाठी 1 हजार कोटींची तरतूदही जाहीर करण्यात आली होती. या कार्यक्रमाला अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि महिला बँकेच्या अध्यक्ष व एमडी उषा अनंतसुब्रमण्यमही उपस्थित होते.

close