मीडियामुळे लोकशाही खराब, जाधवांच्या उलट्या बोंबा !

November 19, 2013 8:19 PM1 commentViews: 977

19 नोव्हेंबर : जी लोकं आपल्याला फार मोठं समजतात आणि विशेष करून प्रसारमाध्यमं मग ते वर्तमानपत्र असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो यांनी लोकशाही खराब करून टाकली आहे असं वादग्रस्त विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केलं. ते औरंगाबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. जाधव एवढ्यावरच थांबले नाही तर ते पुढे म्हणाले,  लोकांचा विश्वास उडावा अशा पद्धतीचं काम इलेक्ट्रानिक मीडिया करत आहे. माध्यमांकडून रोज टीका व्हायला लागल्या तर राजकारणात आज काही जी चांगली लोक आहे जर ती उद्या राजकारण सोडून गेली तर देशाची राजकीय ताकद कुणाच्याही हातात जाईन आणि या देशाच्या लोकशाहीचं भवितव्य काय असेल याचा गांभीर्याने विचार होत नाही अशी चिंताच व्यक्त केली. या अगोदरही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी माध्यमांच्या विरोधात गंभीर वक्तव्य केलं होतं त्यावेळी माध्यमांनी बहिष्कार घातल्यानंतर खुद्द काकांना म्हणजेच शरद पवार यांना मध्यस्थी करावी लागली होती. आणि पुतण्याचा पराक्रमावरुन माध्यमांची माफी मागावी लागली होती. भास्कर जाधव तर आताच प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाले आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आता याबाबत काय भूमिका घेणार असा प्रश्न उपस्थित झालाय.

  • Manaci Joshi

    agdi khara bolalet Bhaskar Jadhav..

close