चिपळूणजवळ कंपन्यांच्या प्रदूषणामुळे हजारो मासे मृत

November 19, 2013 8:40 PM0 commentsViews: 230

mase detd19 नोव्हेंबर : चिपळूण जवळच्या गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीच्या प्रदूषणामुळे मासे मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुखी पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीतल्या साफीस्ट या यीस्ट बनवणार्‍या कंपनीच्या प्रदूषणामुळे हा प्रकार घडत असल्याचा आरोप होतोय.

यासंबंधी शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कंपनीवर धडक मारून ही कंपनी ताबडतोब बंद करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे शेतकर्‍यांची जनावरं ही याच पाण्यावर अवलंबून असल्यामुळे ही जनावरं दगावत असल्याचं गावकर्‍यांचं म्हणणं आहे. यासंबंधी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्यात.

तसंच स्थानिक आमदारांनी हा प्रश्न विधानसभेत मांडूनही या कंपनीवर आत्तापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. कंपनीच्या प्रदुषणामुळे दूषित झालेल्या नळपाणी योजनेच्या टाक्या बदलून मिळाव्यात या मागणीसाठी निवेदन घेऊन गेलेल्या महिलांनाही कंपनी व्यवस्थापनाने धुडकावून लावलंय. मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणार्‍या या कंपनीला राजकीय आशिर्वाद असल्यामुळेच या कंपनीवर कारवाई होत नसल्याचा आरोपही गावकर्‍यांनी केलाय.

close