पाकिस्तान अतिरेक्यांचं नंदनवन-ओबामा

February 10, 2009 5:32 AM0 commentsViews: 3

10 फेब्रुवारीमुंबई हल्ल्यात हात असल्याच्या आरोपांचा इन्कार करणा-या पाकिस्तानला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पुन्हा फटकारलं आहे. पाकिस्तान हा दहशतवाद्यांसाठी स्वर्ग आहे असा थेट दावाच ओबामा यांनी केला आहे.पाकिस्तानचा फाटा परिसर हा दहशतवाद्यांसाठी सुरक्षित स्वर्ग आहे यात शंका नाही, असा निर्वाळा त्यांनी दिला आहे. पाकिस्तानने अशाचप्रकारे दहशतवाद्यांना आश्रय दिला तर पाकिस्तानचं अस्तित्व संकटात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय. अफगाणिस्तानमधून अमेरिकन फौजा माघारी बोलावण्याची निश्चित वेळापत्रक नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

close