वर्ल्ड चेस चॅम्पियनशीपचा आठवा गेम ड्रॉ

November 19, 2013 8:50 PM0 commentsViews: 399

world chess championship 201319 नोव्हेंबर : वर्ल्ड चेस चॅम्पियनशीप आता निर्णयाक वळणावर आहे. आज आठवा गेम ड्रॉ झाला असून वर्ल्ड नंबर वन मॅग्नस कार्लसनने विश्वविजेतेपदाकडे आपली वाटचाल केली आहे.

या स्पर्धेत सध्याचा जगज्जेता विश्वनाथन आनंदवर त्याने 5-3 अशी भक्कम आघाडी मिळवली आहे. आठव्या गेममध्ये 33 चाली नंतर आनंद आणि कार्लसनने ड्रॉचा निर्णय घेतला. कार्लसनने या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये दोन गेम जिंकले आहेत तर आनंदला एकही विजय मिळवता आलेल नाहीये.

त्यामुळे कार्लसनने आनंदवर दोन पॉईंट्सची आघाडी घेतली आहे. आपल्या पहिल्या जगज्जेतापदपासून कार्लसन फक्त दीड पॉईंट्स दूर आहे त्यामुळे पुढच्या दोन गेममध्ये आनंदला विजयी होणं अत्यंत महत्वाचे आहे. गुरुवारी होणार्‍या पुढील गेममध्ये आनंद पांढर्‍या मोहर्‍यांसह खेळणार आहे.

close