दाभोलकर खून प्रकरणी पोलिसांना अपयश -गृहमंत्री

November 19, 2013 10:30 PM1 commentViews: 702

Image r_r_patil_5234_300x255.jpg19 नोव्हेंबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाचा छडा लावण्यात पुणे पोलिसांना अपयश आल्याची कबुली खुद्द गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिलीय. 3 महिने झाले तरी तपासाच्या अंतिम टप्प्यावर पोलीस पोहोचू शकले नाहीत याची खंत वाटते अशा शब्दांत त्यांनी आपली हतबलता व्यक्त केलीय.

दाभोलकरांचे मारेकरी अजूनही मोकाट आहेत आणि याबद्दल लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे, असंही आर.आर. पाटील यांनी कबूल केलंय. दरम्यान, या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे. पण त्याचा छडा लावूच असा विश्वास पुणे पोलिसांनी व्यक्त केलाय. पोलिसांची तब्बल 22 पथकं गेल्या तीन महिन्यांपासून डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा तपास करत आहे.

त्यात एटीएस आणि मुंबई क्राईम ब्राँचचाही समावेश आहे. हा तपास करताना इतर महत्त्वाच्या 22 गुन्ह्यांचा छडा लागलाय. पण डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा तपास लावण्यात मात्र पोलिसांना यश आलेलं नाहीय. आता तर खुद्द गृहमंत्र्यांनीच अपयशाची कबुली दिलीय. त्यामुळे दाभोलकरांचे मारेकरी सापडणार का, हा प्रश्न उपस्थित झालाय.

  • Dr. Abhijeet Safai

    But whats new information in it? We dont want to read these negative news.

close