‘पृथ्वी’ मिसाईल, पृथ्वी शॉने केल्या 546 धावा

November 20, 2013 5:02 PM0 commentsViews: 3181

pruthavi20 नोव्हेंबर : मुंबईतल्या हॅरिस शिल्ड स्पर्धेत आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची आठवण करून देणारी एक घटना घडली. या स्पर्धेमध्ये 15 वर्षांच्या पृथ्वी शॉने तब्बल 546 रन्स केले. त्याच्या या अचाट पराक्रमानं सर्वांनाच तोंडात बोटं घालायला लावली.

सोळा वर्षांखालच्या गटात खेळणार्‍या पृथ्वीने अरमान जाफरचा 498 रन्सचा विक्रम मागे टाकला. 25 वर्षांपूर्वी याच हॅरिस शील्ड स्पर्धेत सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी तब्बल 664 रन्सची पार्टनरशिप केली होती. 2006 पर्यंत हे रेकॉर्ड कुणीही मोडलेलं नव्हतं. त्यावेळी सचिन आणि विनोद या दोघांनीही ट्रिपल सेंच्युरीज फटकावल्या होत्या. त्यामुळे आता पृथ्वीने सुमारे साडेपाचशे रन्सचा पल्ला गाठल्यानं सगळ्यांनाच सचिन आणि विनोदची आठवण आली.

पृथ्वी शॉनं मुंबईतल्या शालेय स्पर्धांमध्ये आधीच आपला ठसा उमटवलाय. मागील वर्षी याच स्पर्धेत रिझवी स्प्रिंगफिल्ड शाळेकडूनच खेळणार्‍या अरमान जाफरने 498 धावा केल्या होत्या यात 77 फोरचा समावेश होता. याआधी हा विक्रम रिझवीच्याच सरफराज खानच्या नावावर होता. सरफराजने 439 धावा केल्या होत्या. आज पृथ्वीने सर्वांचे रेकॉर्ड मोडीत काढत 500 धावा कुटल्यात. यानंतर आणखी 46 धावांची भर टाकून पृथ्वी आऊट झाला. मात्र त्यांच्या या खेळीने सर्वांना चकीत केलंय.

close