सत्यमची चौकशी सीबीआयने करावी-मुख्यमंत्री रेड्डी

February 10, 2009 6:15 AM0 commentsViews:

10 फेब्रुवारीसत्यम घोटाळ्याची चौकशी सीबीआयने करावी अशी मागणी आंध्रप्रदेश सरकारने केली आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर चौकशीला उशीर होत असल्याची टीका राज्य शासनावर करण्यात येत होती. मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी हे सत्यमचे माजी अध्यक्ष रामलिंग राजू यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप तेलगू देशम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. विधानसभेतही या प्रकरणी बराच गदारोळ झाला. या टिकेनंतर आता राजशेखर रेड्डी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे.

close