सहकारमंत्र्यांना पदावर का ठेवलंय ?-राजू शेट्टी

November 20, 2013 3:25 PM0 commentsViews: 796

Image raju_sheti_300x255.jpg20 नोव्हेंबर : सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचं डोक चालत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पदावर का ठेवलंय असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी विचारलाय. सरकारला डेडलाईन देऊनही अद्याप कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आला नसल्याचं त्यांनी सांगितलंय.

तर दादागिरी करून पुण्यातले साखर कारखाने राजकीय नेत्यांनी सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. पश्चिम महाराष्ट्रात ऊस दरवाढीच्या प्रश्नी स्वाभिमानी शेतकारी संघटनेनं आंदोलन पुकारलं आहे. मात्र पुणे जिल्ह्यात राजू शेट्टींच्या ऊसदर आंदोलनाचा प्रभाव ओसरल्याचं दिसतंय. खुद्द राजू शेट्टी यांनीच त्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.

पुणे जिल्ह्यातील 17 पैकी 15 साखर कारखाने सुरू झालेत. त्यात 9 सहकारी आणि 6 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. दोन साखर कारखाने दिवाळखोरीमुळे बंद आहेत. कारखाने सुरु करण्याविरोधात राजू शेट्टींनी आंदोलनाचा इशारा दिला, पण तरीही कारखाने सुरू झाल्याने त्यांनी खंत व्यक्त केलीय. पण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातले कारखाने मात्र अजूनही बंदच आहेत.

पुणे : 15 कारखाने सुरू

 •  1) सोमेश्वर सहकारी साखर कारखाना
 • 2) माळेगाव सहकारी साखर कारखाना
 • 3) नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना
 • 4) कर्मयोगी सहकारी साखर कारखाना
 • 5) घोडगंगा सहकारी साखर कारखाना
 • 6) छत्रपती सहकारी साखर कारखाना
 • 7) भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना
 • 8) विघ्नहर सहकारी साखर कारखाना
 • 9) संत तुकाराम सहकारी साखर कारखाना

खासगी साखर कारखाने

 • 1) सोनई साखर कारखाना
 • 2) बारामती ऍग्रो साखर कारखाना
 • 3) दौंड शुगर लिमिटेड
 • 4) अनुराज साखर कारखाना
 • 5) श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना
 • 6) व्यंकटेश कृपा साखर कारखाना
close