‘सत्तेवर आल्यास दिल्लीत जनलोकपाल बिल आणणार’

November 20, 2013 4:22 PM0 commentsViews: 391

aam adami20 नोव्हेंबर : आम आदमी पार्टीने आज नवी दिल्लीत जाहीरनामा प्रसिद्ध केला. भ्रष्टाचार दूर करणं हा आपल्या पक्षाचा प्रमुख उद्देश असल्याचं पक्षाचे सदस्य योगेंद्र यादव यांनी यावेळी सांगितलं. ज्या चळवळीतून या पक्षाचा जन्म झाला, ते जनलोकपाल बिल दिल्लीमध्ये 29 डिसेंबरला आणू असं यावेळी जाहीर करण्यात आलं.

तसंच रिटेलमध्ये थेट परकीय गुंतवणुकीला विरोध असल्याचंही यादव यांनी स्पष्ट केलं. या जाहीरनाम्यात दिल्लीकरांना अर्ध्या किंमतीत वीज, 700 लिटर मोफत पाणी आणि संपूर्ण दिल्लीला राज्याचा दर्जा देण्याचं वचनही देण्यात आलंय.

तसंच 29 डिसेंबरला रामलीला मैदानावर दिल्ली विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात येईल आणि दिल्ली जनलोकपाल बिल पारित केलं जाईल. या विधेयकात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांपासून ते सरकारी कर्मचार्‍यांपर्यंत सर्वांना चौकशीच्या कक्षेत घेण्यात येईल असं वचनही आम आदमी दिलंय.

close