पं.भीमसेन जोशींना भारतरत्न प्रदान

February 10, 2009 7:17 AM0 commentsViews: 8

10 फेब्रुवारी पुणेस्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांना पुण्यातील त्यांच्या घरी भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंडितजींच्या प्रकृती अस्वास्थामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अतिरिक्त गृह सचिव ए.एफ.अहमद यांनी पंडितजींना हा पुरस्कार दिला. पंडितजींना हा पुरस्कार 4 नोव्हेंबरला जाहीर झाला होता. भारतरत्न पुरस्कार निवासस्थानी जाऊन देण्याचा ही पहिलीच वेळ आहे. हा सोहळा साधेपणाने साजरा झाला.

close