बाळासाहेबांच्या स्मारकासाठी क्रीडाभवनाचा पर्याय

November 20, 2013 7:21 PM0 commentsViews: 1524

balasaheb smarak20 नोव्हेंबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आता हालचालीना वेग आलाय. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्कसमोरील मुंबई महापालिकेच्या क्रीडाभवनाचा विचार केला जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या क्रीडाभवनाची पाहणी सुद्धा केलीय. या स्मारकाच्या आराखड्याची प्रत आयबीएन लोकमतच्या हाती लागली असून यासाठी एक सर्वपक्षीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष शरद पवार असणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा प्रश्न गेल्या वर्षभरापासून रखडलेला आहे. दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन स्मारकाच्या विषयावर चर्चा केली होती. पवारांनी तातडीने दखल घेत स्मारकासाठी महापौर बंगल्याची पाहणी केली होती. त्यापैकी क्रीडाभवनाच्या जागेवर बाळासाहेबांचं स्मारक व्हावं यासाठी शिवसेनेकडुन पहिली पसंती दिली गेली आहे. यासाठीच शिवाजी पार्कसमोरील मुंबई महापालिकेच्या क्रीडाभवनाचा विचार केला जात आहे.

या क्रीडाभवनाच्या जागेवर 55 हजार चौरस फुटाचं बांधकाम शक्य आहे. या अगोदर महापौर बंगल्याच्या परिसरात स्मारकाबाबत विचार केला जातोय पण तिथे 19 हजार चौरस फूट बांधकाम शक्य आहे. त्यामुळे क्रीडाभवनावर अतिरिक्त जागा असल्यामुळे बाळासाहेबांचं भव्य स्मारक उभारलं जाईल अशी या मागची भूमिका आहे. या स्मारकासाठी एक सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष शरद पवार असणार आहे. तसंच गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि महानायक अमिताभ बच्चन यांनी या समितीमध्ये असावं अशी विनंती शिवसेनेच्या वतीने करण्यात आली असून लतादीदींनी समितीमध्ये येण्याचं मान्य केलंय.

समितीत कोण कोण सदस्य असणार?

  • शरद पवार – अध्यक्ष
  • लीलाधर डाके – शिवसेना
  • संजय राऊत – शिवसेना
  • सुभाष देसाई – शिवसेना
  • दिवाकर रावते – शिवसेना
  • नितीन गडकरी – भाजप
  • गोपीनाथ मुंडे – भाजप
  • सुशीलकुमार शिंदे – काँग्रेस
close