अण्णांच्या संशयामुळे दुखावलो -केजरीवाल

November 20, 2013 7:23 PM0 commentsViews: 394

Image img_223032_kejriwal_240x180.jpg20 नोव्हेंबर : आम्ही अनेक लोकांना आव्हान दिलंय, त्यामुळेच आमच्याविरोधात कट रचला जातोय, असं मत आम आदमी पार्टीचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केलंय. तसंच अण्णा हजारे यांनी माझ्यावर संशय व्यक्त केल्यामुळे मला दु:ख झालंय, अशी खंतही केजरीवाल यांनी व्यक्त केली.

 

आज आम आदमी पार्टीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला यावेळी ते बोलत होते. दोन दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या आम आदमीच्या पत्रकार परिषदेत नचिकेता वाल्हेकर यांने केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांच्यावर काळी शाई फेकली होती. या प्रकरणानंतर अण्णांनी झालेला प्रकार दुर्देवी आहे पण केजरीवाल यांनी माझं नाव वापरू नये.

 

त्यांनी माझ्या नावे सीमकार्ड वापरलं त्यांचं पत्रही मला मिळालं. याबद्दलच मी त्यांना पत्र लिहून याचा जाब विचारला होता. केजरीवाल यांच्यावर विश्वास आहे पण त्यांनी माझं नाव वापरू नये अशी ताकीद अण्णांनी दिली होती. यावर केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली.

 

close