टोमॅटो 70 रुपये किलो !

November 20, 2013 7:29 PM0 commentsViews: 113

Garden-tomatoes20 नोव्हेंबर : गेल्या काही महिन्यांपासून कोणती ना कोणती भाजी महाग होताना दिसतेय. आधी कांद्यानं सर्वांना रडवलं आता टोमॅटोच्या चढ्या भावांनी सर्वसामान्य त्रस्त झालेत. किरकोळ बाजारात सध्या टोमॅटो 70 रुपये किलोनं विकले जात आहेत. परतीच्या पावसाने झोडपल्यानं देशांतर्गत बाजारात टोमॅटोची टंचाई निर्माण झाली आहे.

 

गुजरात, मध्यप्रदेशाबरोबरच महाराष्ट्राच्या काही भागात टोमॅटोच्या पिकाला पावसानं चांगलंच झोडपलं होतं. परिणामी घाऊक बाजारात टोमॅटोची आवक 70 टक्क्यांनी घटली आहे. म्हणूनच भाव चढलेत.नाशिकच्या काही भागात टोमॅटो वाचले असल्यानं देशभरातल्या व्यापार्‍यांनी तिथे तळ ठोकलेत.

 

गेल्या 20 वर्षात घाऊक बाजारात टोमॅटोला सर्वाधिक भाव मिळतोय. 1 जानेवारीनंतर गुजरातचा माल बाजारात आल्यावर हे भाव स्थिर होण्याची शक्यता आहे.

close