अल-कायदाची भारताला धमकी

February 10, 2009 10:42 AM0 commentsViews: 3

10 फेब्रुवारी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारखे आणखी हल्ले करण्याची धमकी अल कायदानं भारताला दिली आहे. पाकवर हल्ला करण्याचा प्रयत्न भारताने केल्यास त्याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा अल-कायदानं दिला आहे. त्यासंदर्भातला एक व्हिडिओ टेप बीबीसीला मिळाली. ही टेप 20 मिनिटांची आहे. आत्मघातकी पथक भारतात पाठवून, विध्वंस घडवू अशी धमकी यात देण्यात आली. अरेबीक भाषेत ही धमकी देण्यात आली. शेख मुस्तफा अबू याजिद यानं ही धमकी दिली आहे. ऑगस्टमध्ये अफगाणीस्तानात अमेरिकेने केलेल्या हल्यात याजिद ठार झाल्याच सांगण्यात येत होतं. अल जवाहिरी यानेच पाकच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुत्तो यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला होता, असंही याजिदनं या व्हिडिओत म्हटलंय. अल जवाहिरीनंतर याजिद अल-कायदाचा दुस-या क्रमांकाचा नेता समजला जातो.

close