दाभोलकरांच्या खुनाच्या निषेर्धात अंनिसचं आंदोलन

November 20, 2013 10:01 PM0 commentsViews: 138

20 नोव्हेंबर : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला तीन महिने पूर्ण झालेत. पण अजूनही गुन्हेगारांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीय. त्याचा निषेध करण्यासाठी दाभोलकर यांचा पुण्यात ज्या ठिकाणी खून झाला होता, त्याठिकाणी अंनिसनं आंदोलन केलं. पुण्यात आणि राज्यातही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे सामान्य माणसांनी काय करायचं असा सवाल हमीद दाभोलकर यांनी विचारलाय. पोलिसांची तब्बल 22 पथकं गेल्या तीन महिन्यांपासून डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा तपास करत आहे. त्यात एटीएस आणि मुंबई क्राईम ब्रँचचाही समावेश आहे. हा तपास करताना इतर महत्त्वाच्या 22 गुन्ह्यांचा छडा लागलाय. पण डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा तपास लावण्यात मात्र पोलिसांना यश आलेलं नाही.

close