कसाबला दाऊदकडून धोका

February 10, 2009 1:40 PM0 commentsViews: 8

10 फेब्रुवारी मुंबईमुंबई हल्ल्यातला दहशतवादी कसाबवर दाऊदचे गुंड हल्ला करू शकतात. असा गुप्तचर संस्थांकडून रिपोर्ट मिळाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. आता लवकरच कसाबची पोलीस कोठडी संपणार आहे आणि त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळणार आहे. त्यामुळे त्याला मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवावं लागणार आहे. आर्थर रोड जेलमध्ये दाऊदचे अनेक गुंड आहेत. त्यात अनेक शार्प शूटर्स आहेत. तसंच मुंबई बॉम्बस्फोट, मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी तसंच छोटा राजन, अरूण गवळी टोळीतील अनेक गुंड आणि इतर गुन्हेगारही आर्थर रोड जेलमध्ये आहेत. कसाबवर खटला सुरू होणार आहे तो मुंबईत होणार असल्यामुळे त्याला मुंबईच्या बाहेर ठेवणं मुंबई पोलिसांना शक्य नाही. आर्थर जेलमध्येच स्पेशल कोर्ट बनवलं गेलं आहे. तिथेच कसाबचा खटला चालणार आहे. आता कसाबवर दाऊदचे गुंड हल्ला करू शकतात, असा गुप्तचर संस्थांकडून रिपोर्ट मिळाल्यामुळे आर्थर रोडमधील इतर आरोपींना कुठे ठेवायचं हा प्रश्न पोलिसांच्या समोर उभा आहे. याबाबत माजी आयपीएस पोलीस अधिकारी वाय.पी.सिंग यांना विचारलं असता ते म्हणाले, सद्या कसाब आर्थर रोडमधल्या अंडा सेलमध्ये आहे आणि तिथे त्याच्या सुरक्षेला कोणताही धोका नाही. कारण तिथे अत्यंत कडक सुरक्षेमध्ये त्याला ठेवण्यात आलं आहे.

close