हेलेन चक्रीवादळ आज आंध्रच्या किनार्‍यावर धडकणार

November 21, 2013 4:46 PM0 commentsViews: 529

helan cyclone21 नोव्हेंबर : बंगलाच्या उपसागरावर तयार होणारं हेलेन हे चक्रीवादळ आज रात्री आंध्र प्रदेशात कावली या ठिकाणी धडकण्याची शक्यता आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ आधी ईशान्य आणि नंतर नैऋत्य दिशेनं प्रवास करेल.

त्यानंतर ते रात्री आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूकडे सरकेल. आधी वादळी वार्‍यांचा वेग ताशी 55 किलोमीटर असेल, मात्र नंतर तो वाढून ताशी 100 किलोमीटर होईल आणि जमिनीवर धडकण्याच्या वेळेस त्याचा वेग ताशी 120 किलोमीटर असेल.

यामुळे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून उत्तर तामिळनाडूमधल्या मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय. तसंच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे अर्थात एनडीआरएफची पथकं दोन्ही राज्यांकडे आधीच तैनात करण्यात आली आहे.

close