लैंगिक अत्याचाराचा आरोप,’तहलका’च्या संपादकाचा राजीनामा

November 21, 2013 4:07 PM0 commentsViews: 376

tarun tejpal21 नोव्हेंबर :शोध पत्रकारितेला वाहिलेल्या तहलका साप्ताहिकाचे संपादक तरूण तेजपाल यांच्या त्यांच्याच एक सहकारी पत्रकार महिलेनं लैंगिक अत्याचारांचा आरोप केला आहे. आपल्यावर झालेल्या आरोपांमुळे तरूण तेजपाल कबुली देत सहा महिन्यांच्या काळासाठी पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांना तेजपाल यांनी ईमेल करून कळवलंय.

या प्रकरणाची गोवा सरकरानंही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. गोवा पोलिसांनी ज्या हॉटेलमध्ये तहलकाचा थिंक फेस्टिव्हल सुरु होता तिथलं सीसीसीटीव्ही फुटेज मागवलंय. सीसीटीव्ही फुटेजमुळे या प्रकरणात महत्त्वाची माहिती मिळू शकेल.

या हॉटेलमधल्या एलिव्हेटरमध्ये तेजपाल यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्याच एका महिला सहकारी पत्रकार महिलेनं केले होते. त्यानंतर तेजपाल यांनी तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांना आपण पदावरून दूर होत असल्याचं कळवलं. आता सहा महिन्यांसाठी चौधरी या तहलकाच्या संपादकपदाची धुरा वाहतील. दरम्यान, राष्ट्रीय महिला या प्रकरणाची स्वत:हून दखल घेणार असल्याची माहिती कळतीयं.

तरुण तेजपाल यांनी शोमा चौधरी यांना ईमेलमध्ये काय लिहिलंय ?

“मी भान विसरलो, परिस्थितीची जाण ठेवली नाही, त्यामुळे ही दुदैर्वी घटना घडली. जे घडलं ते आपल्या सर्वांच्या तत्वांच्या आणि लढ्याच्या विरोधात आहे. संबंधित पत्रकाराशी केलेल्या गैरवर्तनाबद्दल मी आधीच विनाशर्त माफी मागितली आहे. पण मला प्रायश्चित्त घेतले पाहिजे, त्यामुळे मी पुढचे सहा महिने तहलकाचं संपादकपद आणि ऑफिसपासून स्वतःला दूर ठेवत आहे.”

close