मोदींच्या सभेत मुझफ्फरनगर दंगलीतील आरोपी आमदारांचा सत्कार

November 21, 2013 2:35 PM0 commentsViews: 178

modi sabha21 नोव्हेंबर : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी सध्या वादाच्या भोवर्‍यात सापडलेत. आज उत्तर प्रदेशमध्ये आग्रा इथं भाजपची जाहीर सभा पार पडली.

या सभेत मुझफ्फरनगर दंगली प्रकरणी भाजपचे आमदार सुरेश राणा आणि संगीत सोम यांचा सत्कार करण्यात आला मात्र या सत्कारच्या वेळी मोदींनी येण्याचं टाळलं. या दोन्ही आमदारांवर सप्टेंबरमध्ये मुझफ्फरनगर दंगल भडकावण्याचा आरोप आहे, त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आलेत.

सध्या ते दोघेही जामीनावर बाहेर आहेत. या सभेसाठी उत्तर प्रदेशाचे प्रभारी अमित शाह हे या सभेला उपस्थित होते. यापुर्वीही बहारिचमध्ये भाषण करताना मोदी यांना राज्य सरकारवर भाजपच्या दोन आमदारांना गोवल्याचा आरोप केला होता.

close