पोलिसांचा पराक्रम, सात महिन्यांच्या चिमुरड्याला कोठडी

November 21, 2013 2:58 PM1 commentViews: 4209

satra news21 नोव्हेंबर : सातारा जिल्ह्यातील फलटण येथे ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलिसांनी अवघ्या सात महिन्यांच्या चिमुरड्याला तीन दिवसांपासून पोलीस कोठडीत ठेवण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

विशेष म्हणजे हा चिमुरडा पाचच दिवसांपासून आईविना पोरकी झालाय. अशा बाळाला पोलीस कोठडीत ठेवण्याचं पोलिसांचं हे कृत्य म्हणजे माणुसकीला काळिमा फासणारं ठरलंय. नीता दादासाहेब ननावरे या विवाहितेनं हुंड्यासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून स्वतःला जाळून घेतलं होतं.

या प्रकरणातल्या आरोपींना पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती. त्यावेळी या प्रकरणात कोणताही दोष नसलेल्या चिमुरड्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा पोलिसांचा प्रताप आयबीएन लोकमतच्या कॅमेर्‍यात कैद झालाय.

  • uday

    are police na kay bolave tech nahi kalat kadhi khadi tar jiv ki pran ase asel tar mulache zale hal

close