एअरलाइन्स कंपन्यांची दरवाढ लागू

February 10, 2009 2:28 PM0 commentsViews: 2

10 फेब्रुवारी मुंबईएअरलाइन्स कंपन्यांनी सहा फेब्रुवारीला घेतलेल्या बैठकीनंतर आता विमानतिकिटांचे दर वाढवल्याचं उघड झालं आहे. बहुतेक सर्व एअरलाइन्स कंपन्यांनी दरवाढ केली आहे. आणि ही दरवाढ शनिवारपासून 10 ते 20 टक्के लागू झाली आहे. मात्र प्रवासी आणि एजंट यांना याबाबत कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. फक्त कॉर्पोरेट ग्राहकांनाच दरवाढीबाबत कळवण्यात आलं आहे. एअरलाइन्स इंडस्ट्री प्रचंड तोट्यात असल्यामुळे तसंच ग्राहकांची संख्या कमी झाल्यामुळे दर वाढवणं भाग पडलं असंही या कंपन्यांचं म्हणणंआहे. स्पाईसजेट, इंडिगो, गो एअरवेज आणि किंगफिशर रेड या एअरलाइन्सनी ही दरवाढ केली आहे.

close