पुणे विद्यापीठाचं हीरक महोत्सवी वर्ष

February 10, 2009 6:47 AM0 commentsViews: 1

10 फेब्रुवारी पुणे प्राची कुलकर्णी पुणं हे विद्येचं माहेर घर. पुण्याला ही पदवी मिळवून देणारं आणि 'ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट म्हणून ओळखलं जाणारं पुणे विद्यापीठ हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करतंय. 1948 मध्ये डॉ. जयकरांच्या पुढाकारानं या विद्यापीठाची स्थापना झाली. 530 महाविद्यालयं, 350 संस्था आणि 40 विषयांचे विभाग असं आहे पुणे विद्यापीठ. यंदा विद्यापीठाचं हीरक महोत्सवी वर्ष. यानिमित्तानं अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. विद्यापीठ आता ट्रिपल कनेक्टिव्हिटीनं जोडलं जाणार आहे. नूतनीकरण सुरू असलेल्या मेन बिल्डिंगचं उदघाटनही यंदा होणार आहे. हीरक महोत्सवाच्या निमित्तानं पुणे विद्यापीठाची कीर्ती आता, साता समुद्रापार जाणार आहे. विद्यापीठाचं आता दुबईतही कॅम्पस सुरू होतंय.

close