काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळेच सपा-बसपाचा जन्म -मोदी

November 21, 2013 7:15 PM0 commentsViews: 843

21 नोव्हेंबर : काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळेच सपा आणि बसपासारख्या पक्षांचा जन्म झाला अशी खरमरीत टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केली. केंद ्रसरकारला विकासात रस नाही त्यांना फक्त व्होट बँकेचं राजकारण करायचं असा आरोप मोदींनी केला. आग्रामध्ये आज मोदींची प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि राज्यातल्या सपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दिल्लीत बसलेल्या सरकारचे कोळसा घोटाळ्यात हात काळे झाले आहे. जेंव्हा सुप्रीम कोर्टाने कारवाईचे आदेश दिले त्यानंतर या सरकारने फाईल गहाळ झाल्याचं कारण दिलं. एकावेळेस सुप्रीम कोर्टात हे सरकार आपली बाजू मांडू शकतं पण सर्व जनतेला माहीत हे सरकारचं गायब झालं आहे अशी टीकाही मोदींनी केली. दरम्यान, दुसरीकडे याच रॅलीत मोदी येण्याच्या आधी मुझफ्फरनगर दंगलीत अटक झालेल्या वादग्रस्त आमदारांचा सत्कारी करण्यात आला.

close