निराधार चिमुरड्यांना हवा आधार !

November 21, 2013 7:00 PM0 commentsViews: 247

संतोष दळवी ,कर्जत

21 नोव्हेंबर : रायगड जिल्ह्यातला कर्जत या आदिवासी तालुक्यातल्या गोरेवाडीत प्राथमिक शिक्षण घेणारी जितेंद्र, अनंता आणि सागर ही तिन्ही भावडं आज पोरकी झाली आणि अक्षरशः उघड्यावर पडलीत. या मुलांचे आई-वडील, आजी-आजोबा आणि एक आत्या या जवळच्या नातेवाईकांचा क्षयरोगाने बळी गेले. इतक्या लहान वयात एवढं मोठं संकट पेलणार्‍या या मुलांच्या आयुष्याचाच प्रश्न निर्माण झालाय.

कर्जत तालुका हा आदिवासी तालुका, याच तालुक्यातील प्राथमिक शिक्षण घेणार्‍या जितेंद्र,अनंता आणि सागर आज पूर्णपणे उघड्यावर पडली आहेत. ज्या अजाणतेपणी मुलांना आई-वडिलांची मानसिक -आर्थिक आधाराची गरज असते त्याच वयात घरातील आजी-आजोबा,आई-वडिलांचा क्षयरोगाने बळी गेल्याने या मुलाना कळायच्या आतच ही मुलं पोरक ी झाली आहेत.

कर्जत तालुक्यातील गोरेवाडी नवसू गावाडा मोलमजुरी करुन आणि रेशनच्या धान्यावर गुजराण करत होता. नवसुला 55 व्या वर्षी क्षयरोगाने ग्रासले त्यातच त्याचे निधन झाले. पुढे हाच रोग पुन्हा त्याची पत्नी सोनू हिला झाला आणि त्यांचे ही निधन झाले. इतक नाही तर हा जीव घेणा रोग त्यांच्या मुलाला आणि सुनेला झाला आणि त्यात या नवरा, पत्नीचं निधन झालं. या जोडप्याला मात्र तीन मुलं आहेत. इतके दिवस या चिमुरड्यांचा सांभाळ त्याची आत्या करत होती पण पाच महिन्यांपुर्वी त्यांना ही क्षयरोग होऊण त्यांचे निधन झालं.

सध्या ही मुलं मोलमजुरी करणार्‍या दुसर्‍या आत्याकडे झोपण्यासाठी जाता असून शाळेत मिळालेल्या जेवण आणि कपड्यांवर त्यांची गुजराण सुरु आहे. या मुलांना आपल्या आर्थिक आणि मानसिक आधाराची गरज असून या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदतीचे आवाहन दिशा केंद्रातर्फे करण्यात येतंय. त्यासाठी या नंबरवर संपर्क साधता येईल.

संपर्क – अशोक जगले – लँडलाईन नंबर – 02148-223908, मोबाईल – 9145462580
गुलाब मेगाळ (आत्या) – 02148-689825

close