तापी नदीच्या काठावर 45 कुटुंबांचा जगण्याचा संघर्ष

November 21, 2013 7:55 PM0 commentsViews: 457

dhule tapi21 नोव्हेंबर : सारंगखेडा बॅरेजच्या पाण्यामुळे तापी नदीच्या काठावरच्या 45 कुटुंबांची घरं धोक्यात आलीत. धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यातल्या चावळदे गावातील गावकरी यामुळे जीव मुठीत घेऊन जगत आहेत. तब्बल 40 वर्ष उलटून गेली तरी त्यांची पुनर्वसनाची प्रतिक्षा संपलेली नाही.

नदीपात्राची रुंदी वाढत जाऊन या घरांखालची जमीन धसू लागली आहे. घरांच्या भिंतींना तडे गेलेत. इतकंच नाही तर काही घरंच नदीपात्रात कोसळली होती. यामुळे या गावातल्या गावकर्‍यांमध्ये खूप भितीचं वातावरण आहे. गावकर्‍यांनी गावातल्या एका समाजमंदिरात आसरा घेतलाय.

याबाबत प्रशासकीय अधिकार्‍यांना पाहणीही केली, मात्र प्रत्यक्षात काहीच करत नाहीत अशी गावकर्‍यांची तक्रार आहे. या प्रकल्पात 29 गावांच्या पुनर्वसनाची योजना आखण्यात आली. त्यापैकी फक्त 10 गावांचं पूर्ण पुनर्वसन झालंय.

close