भारताचा रोमहर्षक विजय

February 10, 2009 4:59 PM0 commentsViews: 1

10 फेब्रुवारीभारतानं कोलंबोतील टी – 20 स्पर्धेत यजमान श्रीलंकेवर शानदार विजय मिळवला. भारतानं हा विजय श्रीलंकेवर 3 विकेट आणि 4 बॉल राखून मिळवला.रन्सची पठाणी वसुली करणारे युफूस आणि इरफान पठाण भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. आधी श्रीलंकेनं भारतापुढे 172 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. या टार्गेटचा पाठलाग करताना भारताचे मुख्य बॅटसमन झटपट आऊट झाले. पण शेवटी पठाण बंधूनी तुफान फटकेबाजी करत भारताला 3 विकेट आणि 4 बॉल राखून विजय मिळवून दिला. युफूस पठाणने नाबाद 22 तर इरफाननं नाबाद 33 रन्स केले. त्याआधी टॉस जिंकून पहिली बॅटिंग करणा-या श्रीलंकेची सुरुवात जबरदस्त झाली. ओपनिंगला आलेल्या तिलकरत्ने दिलशान आणि सनथ जयसूर्या जोडीनं धडाकेबाज सुरुवात करून दिली. पहिल्या 5 ओव्हरमध्येच या जोडीनं श्रीलंकेला 50 रन्सचा टप्पा ओलांडून दिला. पण फटकेबाजीच्या नादात जयसूर्या 33 रन्स करून आऊट झाला. तर दिलशाननं 7 फोर आणि 1 सिक्स मारत सर्वाधिक 61 रन्स केले. मॅन ऑफ द मॅच युसूफ पठाणला देण्यात आलं.

close