भारताचा विंडीजवर ‘विराट’ विजय

November 21, 2013 9:05 PM0 commentsViews: 1597

virat 34343421 नोव्हेंबर : वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी सामन्यात विजय मिळवून भारताने वन डे सीरिजमध्येही विजयी सलामी दिली आहे. भारत आणि वेस्टइंडिजदरम्यान झालेल्या पहिल्या वन डेत भारतानं 15 ओव्हर आणि 6 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला.

पहिली बॅटिंग करणारी वेस्टइंडिजची टीम अवघ्या 211 रन्सवर ऑलआऊट झाली. विजयाचं हे आव्हान भारतानं 35व्या ओव्हरमध्ये पूर्ण केलं.फॉर्मात असलेल्या रोहित शर्मानं 72 रन्स केले.

तर विराट कोहलीनं 86 रन्सची मॅच विनिंग खेळी केली. कोहलीचं शतक हुकलं असलं तरी आपल्या वन डे कारकिर्दीत त्यानं 5 हजार रन्सचा टप्पा पूर्ण केला आहे.

close