स्टिंग ऑपरेशनमुळे ‘आम आदमी’ अडचणीत

November 22, 2013 4:07 PM0 commentsViews: 1473

aam admi22 नोव्हेंबर : स्टिंग ऑपरेशन प्रकरणामुळे आम आदमी पार्टी चांगलीच वादात सापडली आहे. या प्रकरणामुळे आम आदमीचे सदस्य योगेंद्र यादव यांनी पत्रकार परिषद पक्षाची भूमिका मांडली आणि स्टिंग ऑपरेशनचे फूटेज चार तासात देण्याचं आव्हान केलं आहे.

तसंच देणगीदारांकडून शहानिशा न करताच आम आदमी पार्टीच्या सदस्यांनी देणगी घेतल्याचं सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन पक्षाचे सदस्य योगेंद्र यादव यांनी दिलंय. हे स्टिंग ऑपरेशन करणार्‍या मीडिया सरकार या वेबसाईटकडे त्याचं रॉ फुटेज मागवलंय, जर त्यांनी ते चार तासांच्या आत दिलं नाही तर त्यांच्या हेतुबद्दल शंका घेऊन आम्ही कायदेशीर कारवाई करू असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

या स्टिंग ऑपरेशनमुळे आम आदमी पार्टी अडचणीत आली आहे. त्यासंबंधी पत्रकार परिषदेत पक्षानं भूमिका स्पष्ट केली. मात्र, आपल्याला मुदत देण्याचा आम आदमी पार्टीला काय हक्क आहे असा सवाल मीडिया सरकारच्या अरुनंजन झा यांनी विचारलाय.

close