आनंदसाठी आज ‘करो या मरो’चा मुकाबला

November 22, 2013 1:34 PM0 commentsViews: 180

vishavanath andand22 नोव्हेंबर : चेन्नईत सुरु असलेल्या वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या विश्वनाथ आनंदचं जेतेपद धोक्यात आलंय. आतापर्यंत झालेल्या नऊ गेममध्ये आनंदला एकही गेम जिंकता आलेला नाही. तर कार्लसननं तीन गेम जिंकत 6-3 अशी आघाडी घेतलीय आणि जेतेपदापासून कार्लसन केवळ अर्धा पॉईंट दूर आहे.

आनंद आणि कार्लसनदरम्यान आज दहावा गेम रंगतोय, आणि मॅचमध्ये आव्हान कायम राखण्यासाठी आनंदला आजची मॅच जिंकावीच लागणार आहे.गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये मॅग्नस कार्लसननं आनंदवर मात केली. या विजयामुळे कार्लसनकडे 6-3 अशी आघाडी झाली असून जेतेपदापासून कार्लसन आता केवळ 1 पाऊल दूर आहे.

या स्पर्धेत आणखी तीन गेम बाकी आहेत, आणि तीनही गेम आनंदला जिंकावे लागतील तर कार्लसनला जेतेपदासाठी केवळ अर्ध्या पॉईंटची गरज आहे. मॅग्नस कार्लसननं सलग दोन मॅचेस जिंकल्यामुळे त्याच्याकडे 5-3 अशी आघाडी आहे. उरलेल्या तीन गेमपैकी आनंदसाठी आता करो या मरोची परिस्थिती आहे. तरंच त्याला विश्वविजेतेपद राखता येईल.आनंदच्या कारकिर्दीतली ही सर्वात कठीण स्पर्धा ठरल्याचं मानलं जातंय.

close