केंद्रीय मंत्री महावीर प्रसाद यांच्यावर खुनाचा गुन्हा

February 11, 2009 4:42 AM0 commentsViews: 2

11 फेब्रुवारीकेंद्रीय लघुउद्योग मंत्री महावीर प्रसाद यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातल्या गाघा पोलीस स्टेशनमध्ये कलम 302 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावीर प्रसाद हे बन्सगाव मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. महावीर प्रसाद यांच्यावर जानेवारी 2008 मध्ये रामप्रकाश सिंग यांचा खून केल्याचा आरोप आहे. रामप्रकाश सिंग यांची पत्नी आणि मुलानं याबाबत न्यायदंडाधिकारी कोर्टात याचिका दाखल केली होती. यात महावीर प्रसाद यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. पण ऍक्सिडेन्टची केस दाखल असल्यानं कोर्टानं ही याचिका फेटाळली. त्यानंतर हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. आता हाय कोर्टानं याची दखल घेत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.

close