बंगळुरूमध्ये एअर शोला सुरुवात

February 11, 2009 7:57 AM0 commentsViews: 1

11 फेब्रुवारी बंगळुरूएअरो इंडियाचा 7 वा मोठा एअर शो बंगळुरूमध्ये सुरू झाला आहे. फ्रान्स, बोलिव्हियासह इतर 8 देशांचे संरक्षणमंत्रीही यावेळी उपस्थित आहेत. एकूण 25 देशातल्या 592 सदस्यांनी या शोमध्ये भाग घेतला आहे. त्यात अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, इस्रायलसारख्या देशांचाही समावेश आहे. एफ-16, मिग-35 डी, युरो फाईटर आणि सी-17 सारखी फायटर विमान पहिल्यांदाच विमानप्रेमींना पहायला मिळणार आहेत. या शोमध्ये सूर्यकिरण तसंच लाइट कॉम्बेट एअरक्राफ्ट म्हणजे एलसीए या विमानांची प्रात्यक्षिकंही पाहायला मिळतील. त्याबरोबरच मुंबई, चैनई आणि कानपूरमधल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली मॉडेल्सही या शोमध्ये पहायला मिळतील.

close