बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलवर मोर्चा

November 22, 2013 7:47 PM0 commentsViews: 69

22 नोव्हेंबर : दादरच्या इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक व्हावं यासाठी सुरू असलेलं आंदोलन तीव्र झालंय. या स्मारकाचा निर्णय 6 डिसेंबरच्या आधी व्हावा अशी मागणी करत सामाजिक समता मंच संघटनेनं इंदू मिलवर मोर्चा काढलाय. आज दुपारी कार्यकर्त्यांनी गेटच्या आत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करणार्‍या पोलिसांबरोबर त्यांचा जोरदार संघर्ष झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक समता मंच या संघटनेच्या वतीने हे आंदोलन सुरु आहे. यामुळे मिल परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. सहा डिसेंबरआधी हा प्रश्न सुटला नाही तर आक्रमक आंदोलनाचा इशारा इतर दलित संघटनांनीसुद्धा दिलाय.

close