मॅग्नस कार्लसन बुद्धीबळाचा नवा जगज्जेता

November 22, 2013 8:55 PM0 commentsViews: 726

magnus carlsen22 नोव्हेंबर : बुद्धीबळाच्या पटावर गेली पाच वर्ष अधिराज्य गाजवणार्‍या ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदच्या ‘विश्वा’ला मोठा हादरा बसला. चेन्नईत वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये दहाव्या डाव बरोबरीत सुटल्यामुळे नार्वेच्या मॅग्नस कार्लसनने जगज्जेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे 22 व्या वर्षी मॅग्नस कार्लसनने जगज्जेतेपद पटकावलं आहे. सलग नऊ डावात कार्लसनने आनंदवर वरचढ ठरला होता. कार्लसनला जगज्जेतेपदासाठी फक्त अर्धा पॉईंट पाहिजे होता. आज दहावा डाव बरोबरीत सुटल्यामुळे कार्लसनला अर्धा पॉईंट मिळाला आणि जगज्जेतेपदावर आपलं नावं कोरलं. दुखाची बाब म्हणजे  आनंदला आपल्याच मातृभूमीत या पराभवाला सामोरं जावं लागलं.

आनंद 2007 पासून निर्विवाद बुद्धिबळ जगज्जेता होण्याचा मान मिळवलाय. तब्बल पाच वेळा त्याने बुद्धिबळात जगज्जेतेपद मिळवले आहे. 2008 साली त्याने व्लादिमिर क्रॅमनिकला हरवून आपले विश्वजेतेपद कायम राखले होते.तर त्यानंतर 2012 मध्ये बोरिस गेल्फॅडला हरवून पुन्हा विश्वविजेतेपद कायम राखले.

मात्र आज शुक्रवारी 2013 वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये आनंदला विश्वविजेतेपद सोडावे लागले. आपल्या मातृभूमी चेन्नईत वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये आनंदला नऊ गेममध्ये एकही गेम जिंकता आला नाही. तर कार्लसननं तीन गेम जिंकत 6-3 अशी आघाडीस घेतली होती आणि जेतेपदापासून कार्लसन केवळ अर्धा पॉईंट दूर होता. अखेर दहाव्या डावात आनंदने कार्लसनला चिवट झुंज दिली पण त्याची ही झुंज अपयशी ठरली आनंदला विजय तर मिळाला नाही पण डाव बरोबरीत सुटला. मात्र डाव बरोबरी सुटल्यामुळे विश्वविजेतेपद मिळवण्यासाठी कार्लसनच्या पारड्यात लागणार अर्धा पॉईंट पडला. आणि बुद्धिबळ जगाला एक नवा राजा मिळाला. कार्लसन याने वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी ग्रँडमास्टरचा किताब पटकावला होता. वयाच्या 22 व्या वर्षी विश्वविजेतेपद पटकावून कार्लसनने सगळ्यांना चकीत केलंय.

close