प्राचार्यांकडून घेतला माफीनामा, युवासेनेची अशीही दंडेलशाही?

November 22, 2013 10:05 PM0 commentsViews: 561

hindujaउदय जाधव, मुंबई

22 नोव्हेंबर :मुंबईच्या हिंदुजा कॉलेजच्या प्राचार्यांकडुन माफीनामा लिहुन घेतल्यामुळे युवासेना वादात सापडली आहे. कॉलेज विद्यार्थ्यांच्या वार्षिक कार्यक्रमाला परवानगी दिली नाही म्हणून युवासेनेच्या या दंडेलशाही कारभाराचा सर्वांनीच निषेध केला आहे.

मुंबईतलं हिंदुजा कॉलेजने विद्यार्थ्यांच्या वार्षिक कार्यक्रमांना परवानगी दिली नाही, म्हणून युवासेनेने कॉलेजच्या प्राचार्यांनाच जाब विचारला होता पण कॉलेजच्या प्राचार्यांनी कॉलेज बाहेरच्या हस्तक्षेपामुळे नाराजी व्यक्त केली आणि युवासेना कॉलेज चालवतात का, असा प्रश्न विचारला.

त्यामुळे नाराज झालेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना माफीनामा द्यायला भाग पाडलं. अशा प्रकारे कॉलेजच्या प्राचार्यांवर राजकीय दबाव आणून, माफीनामा घेतल्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातून केला जातोय. राजकीय विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी दंडेलशाही करतायत का हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

close