‘वारणा’वर ‘स्वाभिमानी’ची मोटरसायकल रॅली

November 22, 2013 10:09 PM0 commentsViews: 255

varana22 नोव्हेंबर : संघटनेचा विरोध डावलून आमदार विनय कोरे यांनी साखर कारखाना सुरु केला. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज थेट वारणा कारखान्यावर मोटरसायकल रॅली काढली.

कारखानदार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी केला. तसेच सहकारमंत्र्यांना आता खासगीकरण मंत्री म्हणावं लागेलं अशीही टीकाही खोत यांनी केली.

या रॅलीच्या पार्श्वभूमीवर वारणा कारखाना परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी उद्या सकाळी शेट्टी यांना चर्चेसाठी मुंबईमध्ये बोलावलंय.

close