जयवर्धनेने दिला कप्तानपदाचा राजीनामा

February 11, 2009 7:50 AM0 commentsViews: 5

11 फेब्रुवारीश्रीलंकन क्रिकेट टीमचा कॅप्टन महेला जयवर्धनेने कप्तानपदाचा राजीनामा दिला आहे. पाकिस्तान विरुद्धची सीरिज कप्तान म्हणून आपली शेवटची सीरिज असेल असं त्याने जाहीर केलं आहे. टीमच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचं जयवर्धनेने म्हटलंय. वर्ल्डकप पूर्वी पुढच्या कॅप्टनला तयारीला वेळ मिळावा यासाठी आत्ताच हा निर्णय घेतल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. त्याने 26 टेस्ट आणि 97 वन डे मॅचमध्ये श्रीलंकन टीमचं नेतृत्व केलं. आणि वन डे क्रिकेटमध्ये तो श्रीलंकेचा सर्वात यशस्वी कॅप्टन आहे.

close