सेनेचे माजी खासदार रावलेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

November 22, 2013 7:21 PM0 commentsViews: 1038

22 नोव्हेंबर : दक्षिण मुंबईत पाच वेळा खासदारकी भुषवणारे शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार मोहन रावलेंनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. सेनेत सतत डावललं जात असल्यानं आपण नाराज असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र शिवसेना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं. राज यांच्याशी गुरूवारीच भेट ठरली होती. ही भेट व्यक्तिगत होती असंही त्यांनी सांगितलं. मात्र या भेटीमुळे रावले मनसेत जाणार का अशा चर्चांना ऊत आलाय.

close