MET प्रकरणाची आठवड्याभरात चौकशी

November 22, 2013 10:57 PM0 commentsViews: 571

Image img_213672_img_197552_bhujbalmet_240x180_240x180.jpg22 नोव्हेंबर : मुंबईतील एमआईटी मधल्या गैरव्यवहार प्रकरणी पुढच्या एका आठवड्यात महाराष्ट्र सरकारने चौकशी करावी असे आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिलेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ हे एमईटीचे अध्यक्ष आहेत. एमईटीचे उपाध्यक्ष सुनील कर्वे यांनी 2012 साली केलेल्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नव्हती, याबाबत सुनील कर्वे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. महाराष्ट्र सरकारने याप्रकरणात एका आठवड्याच चौकशी करुन आवश्यकता वाटल्यास योग्य ती कारवाई करावी, असे आदेश न्यायमूर्ती गोखले आणि चल्लमेश्वर यांच्या खंडपीठाने दिलेत.

काय आहे MET प्रकरण ?

छगन भुजबळांनी आपल्या पदाचा गैरवापर करून संस्थेच्या 8व्या आणि 10 व्या मजल्याचा खासगी कामासाठी वापर केल्याचा आरोप आहे.  एमईटी च्या आठव्या मजल्यावर छगन भुजबळ यांच्या सुनांची इडनीन फर्निचर ही कंपनी कशी चालवली जात होती आणि तक्रारीनंतर रातोरात तिथलं सामान सांताक्रूझ इथल्या कॉन्व्हेंट ऍव्हेन्यू रोडवरच्या छगन भुजबळ यांच्या बहुमजली बंगल्यामध्ये कसं नेण्यात आलं. पुरावे नष्ट करण्याचं हे कारस्थान इथचं थांबलं नाही. असिस्टंट चॅरिटी कमिशनरने इथं येऊन चौकशी करण्याआधीच त्यांनी अख्ख्या मजल्यावर नवं बांधकाम पूर्ण केलं.

 

close