अफगाणिस्तानातमध्ये बॉम्बहल्ला

February 11, 2009 7:59 AM0 commentsViews: 1

11 फेब्रुवारी काबूलअफगाणिस्तानात काबूलमध्ये एका आत्मघातकी पथकानं बॉम्बहल्ला केला आहे. यात पाचजण ठार झाले असून, अनेकजण जखमी झाले आहेत. काबूलमधल्या न्याय मंत्रालयावर हा हल्ला करण्यात आला. अफगाणी न्याय मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांनुसार पाच बंदूकधा-यांनी हा हल्ला चढवला. शहरातल्या दुस-या भागातही अतिरेक्यांनी पोलिसांवर हल्ला केला. हल्ला झालेल्या भागात महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांचाही समावेश आहे. इथून अफगाणिस्तानचं राष्ट्रपती भवनही जवळ आहे. दरम्यान तालिबानी दहशतवाद्यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

close