स्टिंग ऑपरेशन हे पक्षाविरोधात षडयंत्र -केजरीवाल

November 23, 2013 2:12 PM0 commentsViews: 223

arvinda kejriwal23 नोव्हेंबर : मीडिया सरकार या वेबसाईटने केलेलं स्टिंग ऑपरेशन हे पक्षाविरोधात षडयंत्र असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी केलाय. मागणी करूनही ती टेप मीडिया सरकारनं दिली नाही, याचा अर्थ यात काहीतरी काळंबेरं असल्याचं सिद्ध होतं असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय.

निवडणूक आयोगानंच याबाबत निर्णय द्यावा. त्यानंतर टेपची सत्यता तपासल्यानंतरच कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलंय. मीडिया सरकार टेप्स देत नसल्याबद्दल संशय व्यक्त केला. त्यानुसार कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. ‘मीडिया सरकार’ या वेबसाईटनं हे स्टिंग ऑपरेशन केलंय.

त्यात आम आदमी पार्टीचे काही सदस्य पावत्या न देताच देणग्या घेत असल्याचं उघड होतंय, असा या वेबसाईटचा दावा आहे. दरम्यान, निधी कसा जमवला, याचं उत्तर आम आदमी पक्षानं द्यावं, अशी मागणी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी केली.

close