अखेर हेलेन चक्रीवादळ धडकले, दोघांचा बळी

November 23, 2013 4:31 PM0 commentsViews: 289

helan cyaclon23 नोव्हेंबर : अखेर हेलन चक्रीवादळ शुक्रवारी रात्री आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीला धडकलं. यात दोन जणांचा बळी गेलाय तर शेती आणि पिकांना या वादळाचा जोरदार फटका बसलाय.

सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि आणखीही काही जणांचा बळी गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पुढचे 12 तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. आतापर्यंत सोळा हजार जणांचा सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे.

सध्या या वादळाचा वेग ताशी 110 किलोमीटर पेक्षाही जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर कृष्णा जिल्ह्यातल्या मछलिपट्टणम या ठिकाणी हेलेन शुक्रवारी रात्री धडकलं. यानंतर हे वादळ तामिळनाडूकडे सरकणार आहे.

या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी आंध्र प्रदेश आणि केंद्र सरकार अगोदरच तयारी केली होती. त्यामुळे सोळा हजार जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय.एनडीआरएफची पथकं आधीच दोन्ही राज्यांमध्ये तैनात करण्यात आली आहे. हेलेन चक्रीवादळ शमल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल असं हवामान खात्यानं स्पष्ट केलंय.

close