औरंगाबादमध्ये पॉलिटेक्निकचा पेपर फुटला, परीक्षा रद्द

November 23, 2013 2:02 PM0 commentsViews: 1160

abad pepar23 नोव्हेंबर : औरंगाबादमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण शाखेचा मॅथेमॅटिक्स 1 चा पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे. आज होणारा या विषयाचा पेपर, परीक्षा विभागाने रद्द केलाय.

हा पेपर शुक्रवारी रात्रीच अनेक विद्यार्थ्यांच्या हाती पडला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही बाब परीक्षा नियंत्रकाच्या लक्षात आणून दिल्यानंतर आता या विषयाचा पेपर 4 डिसेंबर रोजी होणार असल्याचं औरंगाबाद पॉलिटेक्निक विभागाने जाहीर केलंय. तंत्रशिक्षण शाखेच्या औरंगाबाद विभागानं या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवलीय.

close