वॉशिंग्टनमध्ये रायफलधारी संशयिताला अटक

February 11, 2009 5:09 AM0 commentsViews: 2

11 फेब्रुवारी वॉशिंग्टनअमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये पोलिसांनी एका संशयित रायफलधारी व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. आपण राष्ट्राध्यक्ष ओबामांसाठी पार्सल घेऊन चाललो होतो, असं त्यानं पोलिसांना सांगितलंय. एका ट्रकमधून जात असताना, एका बिल्डिंगच्या अडथळ्यांपाशी त्याला पोलिसांनी अडवलं.तेव्हा त्याच्याकडे रायफल असल्याचं पोलिसांना आढळून आलं. त्याच्या ट्रकमध्येही अनेक राऊंडस सापडल्याचं, सिनेटच्या सदस्यांनी सांगितलं. पोलिसांनी बिल्डिंग परिसराची पाहणी केली, पण संशयास्पद असं काही आढळलं नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

close