होर्डिंगवरून हायकोर्टानं भाजपला फटकारलं

February 11, 2009 10:02 AM0 commentsViews: 5

11 फेब्रुवारी नागपूरनागपूरमधल्या राष्ट्रीय परिषदेसाठी देशभरातील सर्व महत्त्वाचे भाजप नेते नागपुरात आले होते. त्यांच्या स्वागतासाठी शहराच्या काही ठिकाणी होर्डिंग आणि कटआऊटस लावण्यात आले होते. तसंच सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवर कमानी उभारण्यात आल्या होत्या. या होर्डिंग्जसाठी परवानगी घेण्यात आली होती का असा प्रश्न हायकोर्टानं विचारला आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात या होर्डिंग्जविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान अशा प्रकारच्या कमानी आणि होर्डिंग लावण्याचा अधिकार राजकीय पक्षांना आहे का याबाबत महापलिकेला विचारणा केली आहे.

close