मुंबईत दूध 2 तर अंडे 5 रुपयांनी महागले

November 23, 2013 8:41 PM0 commentsViews: 659

mumbai milk and eags23 नोव्हेंबर : महागाईने त्रस्त मुंबईकरांच्या खिशाला आता आणखी कात्री बसणार आहे. सोमवारपासून बृहन्मुंबई दूध योजनेमार्फत मुंबईत विकल्या जाणार्‍या सर्व प्रकारच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ झालीय.

त्यामुळे मुंबईकरांना गायीच्या टोन्ड दुधासाठी 31 ऐवजी 33 रुपये तर म्हशीच्या फुल क्रीम दुधासाठी प्रतिलिटर 40 ऐवजी 42 रुपये मोजावे लागतील. ग्रामीण भागात हे दर 32 ते 41 रुपये प्रतिलिटर असतील. तर गृहिणींच्या झटपट स्वयंपाकातील आधार असलेली अंडीही पाच रुपयांवर गेली आहे.

होलसेलमध्ये इंग्लिश अंड्यांचा दर हा 4 रु 20 पै. इतका आहे. तर किरकोळ बाजारात इंग्लिश अंडं 5 रुपयांना मिळणार आहे. गावठी अंड्याची किंमत 10 रु.असणार आहे. आत्तापर्यंतचा अंड्याचा हा सर्वोच्च दर आहे. अंड्यांच्या दरात अजूनही वाढ होण्याची शक्यता असल्याचं नॅशनल एग कॉऑर्डिनेशन कमिटीने म्हटलंय.

close