हक्काचं घर रखडलं, घाणीच्या साम्राज्याने जखडलं

November 23, 2013 8:58 PM1 commentViews: 171

nasik gharkul23 नोव्हेंबर : राहाती घरं पाडण्यात आली आणि नवीन घरांचा पत्ता नाही अशी अवस्था आहे नाशिक महापालिकेच्या घरकूल योजनेच्या लाभाथीर्ंची. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानाअंतगर्त नाशिक महापालिकेतर्फे घरकूल योजना राबवण्यात येतेय. 2008 मध्ये ही योजना सुरू झाली. पण गेली 3 वर्ष हे लोक अत्यंत बकाल परिस्थितीत राहात आहेत. पिण्याच्या पाण्याचा पत्ता नाही की वीजेची व्यवस्था नाही. दारातून वाहणारं सांडपाणी आणि गटारातले किडे घरात येतात. त्यांच्या हक्काची घरं मिळवून देण्यासाठी ना नाशिक महापालिकेचं प्रशासन हालचाल करतंय, ना सत्ताधारी पुढाकार घेत आहेत.

2008 साली नाशिक महापालिकेत शहरी गरीबांसाठी घरकूल योजना सुरू करण्यात आली. 2010 मध्ये तिचं जल्लोषात भूमीपूजन करण्यात आलं. 2011 मध्ये लोकांची राहाती घरं पाडून त्यांना पत्र्याच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये शीफ्ट करण्यात आलं.

त्यासाठी जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्रत्थान अभियानाअंतर्गत महापालिकेला तब्बल 334 कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यानुसार 2012 पर्यंत नाशिक महापालिकेनं 16 हजार घरं बांधणं अभिप्रेत होतं. प्रत्यक्षात 2013 संपत आलं तरी अवघी अडीच हजार घरं बांधून उभी आहेत. त्यांचीही आता मोडतोड सुरू झाली आहे. यातल्या एकाही लाभार्थीला महापालिका घर देऊ शकलेली नाही. एका बाजुला बांधलेली घरं रिकामी पडलीत तर दुसर्‍या बाजुला हे लाभार्थी अत्यंत बकाल आयुष्य जगत आहेत.

  • Sunil More

    yala jababdar mansecha manmani pana ahe ka nikami pan ahe ?

close