41 खून करणारा कुख्यात माओवादी अखेर गजाआड

November 23, 2013 7:29 PM0 commentsViews: 603

23 नोव्हेंबर : ‘कानून के हात लंबे होते है’ असं उगाच म्हटलं जात नाही याचंच एक उदाहरण समोर आलंय. तब्बल 41 खून करून फरार झालेल्या बिहारमधील एका कुख्यात माओवादी आरोपीला तब्बल 13 वर्षानंतर पुण्याच्या खडक पोलिसांनी अटक केली आहे. रामजन्म देवलालाल सिंग असं या आरोपीचं नाव असून त्याला ताब्यात घेण्यासाठी बिहार पोलीस पुण्यात दाखल झाले आहेत. बिहारमध्ये 1992 साली आपण तब्बल 37 लोकांना मारल्याची आणि 1996 मध्ये गया जिल्हायातील टिकारी पोलीस स्टेशन जाळून तेथील एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यासह चार पोलीस कर्मचार्‍यांना मारल्याची कबुली रामजन्म सिंग यांनी दिली आहे. विशेष म्हणजे रामजन्म सिंग मागील 13 वर्षापासून पुण्यात मुक्काम ठोकून होता आणि तो एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक पदावर कामही करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

close