अपंगत्वावर मात करून सागरगडावर चढाई

November 23, 2013 10:08 PM0 commentsViews: 104

23 नोव्हेंबर : “अपंगत्व ही आमची समस्या नाही, तसंच गडकिल्ल्यावर चढणं मुळीच कठीण नाही आणि विशेष म्हणजे आम्ही कुणापेक्षा जराही कमी नाही” असं मुंबईतल्या 60 अपंग व्यक्तींनी समाजाला दाखवून दिलंय. अलिबागपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्गम असलेल्या सागर गडावर आज या अपंग व्यक्तींनी यशस्वी चढाई केली. अपंगत्व हा प्रगतीला अडथळा ठरू शकत नाही असा संदेश देणारं हे ट्रेकिंग असल्याचं अपंगांनी म्हटलंय. मुंबईतल्या फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यामातून अपंगांसाठी ट्रेकिंगचा उपक्रम राबवला जातो. महाराष्ट्रातल्या रायगड, राजगड, प्रतापगड अशा किल्ल्यांवर गेली अनेक वर्षे अपंगांना नेलं जातं. त्यासाठी पुर्वतयारीही केली जाते. सागरगडच्या ट्रेकिंगमध्ये सहभागी झालेल्या अपंगांमध्ये 15 महिला आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 260 किल्ले आम्ही सर करणार आहोत असं या उपक्रमाच्या संयोजकांनी सांगितलंय.

close