‘आप’चा असाही ‘रॉक अँड रोल’ प्रचार !

November 23, 2013 10:52 PM0 commentsViews: 571

 अमेय तिरोडकर, नवी दिल्ली.

23 नोव्हेंबर : आम आदमी पक्षाने आज दिल्लीमध्ये ‘गूंज जीत की’ या नावाने जंतरमंतरवर एक कार्यक्रम घेतला. म्युझिक कॉन्सर्टच्या रुपातल्या प्रचारसभेचं स्वरुप या कार्यक्रमाला होतं. निवडणुकीला अवघे दहा दिवस उरले असताना आम आदमी पक्षाची ही प्रचारसभा ही दिल्लीकरांच्या औत्सुक्याची ठरली.

डॉल्बी साऊंड…शार्प हेडलाईटस्….व्हडिओ वॉल…रॅम्प..जिमी जीप…मल्टी कॅमेरा सेट अप आणि स्थळ जंतर मंतर. आपण पहिल्यांदाच निवडणूक लढवतोय. आपले मतदार पण आपल्या सारखेच नवखे.पहिल्यांदाच मतदान करणार आहेत असा पक्षाचा अंदाज आहे. म्हणून मग हा रॉक अँड रोल प्रचार.

अण्णांच्या आंदोलनाला अनेक सेलिब्रेटींनी पाठींबा दिला. ग्लॅमर आलं. आणि आंदोलन यशस्वी ठरलं. राजकारणात यशस्वी होण्यासाठी आंदोलनाचा तोच फॉर्मट तर आम आदमी वापरतंय. पण यशस्वी ठरेल का ?

close